आपला जिल्हा

माजलगाव शहराच्या विकासासाठी कटिबद्ध



आमदार प्रकाश सोळंके यांचे प्रतिपादन; पाच कोटींच्या ३८ रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ 

माजलगाव : नगरपरिषदेच्या माध्यमातून विकासाचा अजेंडा कायम ठेवत आतापर्यंत प्रलंबित असलेली विकासकामे गतीने करण्यात येणार आहेत. मार्च अखेर पूर्ण विकास निधी खर्च होणार असून माजलगाव शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश सोळंके यांनी केले. 

माजलगाव नगर परिषदेंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान ३८ रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ रविवारी सकाळी आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डी.के. देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक बाबुराव पोटभरे, अच्युतराव लाटे, जि.प.सदस्य चंद्रकांत शेजुळ, बाजार समितीचे सभापती संभाजी शेजुळ, नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी विकास कामांस सुरुवात करून रस्त्यांचे कामे सुरू केली आहेत. ३८ रस्त्यांची कामे दर्जेदार करून घ्यावीत व या कामावरही जनतेने लक्ष द्यावे असेही आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले. यावेळी बाबुराव पोटभरे, अच्युतराव लाटे यांची भाषणे झाली.


Comment here