श्वान प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
बीड: श्वान प्रेमींसाठी येत्या १५ ऑगस्ट पासून
बीड शहरात पहिल्या वहिल्या स्नेहम् पशू वैद्यकीय चिकित्सालयाचा भव्य शुभारंभ होत आहे, अशी माहिती डॉ.एस.एस.देशमाने यांनी दिली आहे.
बीड शहरातील श्वान प्रेमींसाठी अत्याधुनिक
स्नेहम् पशू वैद्यकीय चिकित्सालय सुरू होत आहे. येत्या गुरुवार १५ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता डॉ.के.बी.पैठणकर यांच्या शुभहस्ते स्नेहम् पशू वैद्यकीय चिकित्सालयाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला श्रीराम लाखे, नितीन गोपन, डॉ.व्ही.बी.देशमुख, डॉ.आर.डी.कदम आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला शहरातील श्वान प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ.एस.एस.देशमाने, श्रीमती एम.बी.सिरसट, इंजि.त्रिदेव अनिल कांबळे, डॉ.स्नेहल त्रिदेव कांबळे, शुभम शिवाजी देशमाने यांनी केले आहे.
श्वान प्रेमींनी येथे संपर्क साधावा
श्वान प्रेमींसाठी बीड शहरात पहिल्या वहिल्या स्नेहम् पशू वैद्यकीय चिकित्सालयाचा भव्य शुभारंभ होत आहे. अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून श्वान आणि इतर पशुंवर उपचार केले जातील. स्नेहम् पशू वैद्यकीय चिकित्सालयात चिकित्सा, औषधोपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया, ग्रुमिग, त्वचारोग, तपासणी आणि उपचार आदी सुविधा उपलब्ध आहेत. हे चिकित्सालय राजीव गांधी चौक, भक्ती कंट्रक्शन रोड, राहूल मिल्क एजन्सी समोर, गजानन कंज्यूमर शेजारी बीड, (संपर्क : 81498 56585) येथे संपर्क साधावा, असे आवाहन स्नेहम् पशू वैद्यकीय चिकित्सालयातर्फे करण्यात आले आहे.
Comment here