ग्रामस्थांच्या वर्गणीतून बाबांचे भव्य मंदिर उभारणार
धारूर : तालुक्यातील जैतापूर येथे राष्ट्रसंत श्री भगवान बाबा जयंती शुक्रवारी साजरी करण्यात आली. कीर्तनासह सामाजिक व धार्मिक प्रबोधनाचा कार्यक्रम याप्रसंगी पार पडला. ह.भ.प.अतुल महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. माजी जिल्हा परिषद सभापती जयसिंह सोळंके, जय भगवान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब सानप, ओबीसी नेते माधव निर्मळ, प्रदीप नेहरकर, उद्योजक सुग्रीव कराड, युवा नेते भागवत दराडे यांच्यासह धारूर तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक याप्रसंगी उपस्थित होते. जैतापूर ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून गावात राष्ट्रसंत भगवान बाबांचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे.
राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जयंतीच्या औचित्याने राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिराची उभारणी जैतापूर येथे करण्यात येणार आहे. जय भगवान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी समस्त गावकऱ्यांच्या वर्गणीतून हे मंदिर स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. गावातील महिला भगिनींसह ग्रामस्थांनी आठ लाख रुपयांची वर्गणी या कार्यक्रमात जाहीर केली. लवकरच मंदिराच्या बांधकामाची सुरूवात होणार असून राष्ट्रसंत भगवान बाबा जयंतीच्या औचित्याने गावात मंदिर होणार असल्यामुळे उत्साहाचे वातावरण जैतापूर ग्रामस्थात होते. जैतापूर हे धारूर तालुक्यातील छोटेसे टुमदार गाव आहे. गावात कमालीचा एकोपा असून गावाचा चेहरा मोहरा बदलण्यात सरपंच छाया भागवत दराडे यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मत माजी जिल्हा परिषद सभापती जयसिंह सोळंके यांनी व्यक्त केले. कैलास दराडे, अशोक दराडे, प्रकाश दराडे, हनुमंत दराडे, महेश चौरे, विष्णू दराडे, गणेश दराडे, सुशिल दराडे, तुकाराम दराडे, हनुमंत दराडे, गोविंद दराडे, सुरेश दराडे, संजय चव्हाण, गोविंद चव्हाण, अनिल दराडे, बाळासाहेब राठोड, व्यंकटी दराडे, बबन दराडे, गोविंद दराडे, बिभीषण दराडे, राजेभाऊ दराडे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजन केले होते
Comment here