महा-राष्ट्र

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथजी शिंदेच विराजमान व्हावेत..! 

चिमुकल्या दूवाच्या आई-वडिलांनी घातले लालबागच्या गणपतीकडे साकडे 

मुंबई : एकनाथजी शिंदे हेच पुन्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असे साकडे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची अवघ्या दीड वर्षाची ब्रॅण्ड अम्बेसिडर दुवाच्या आई-वडिलांनी आज, अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला लालबागच्या गणपतीकडे घातले आहे.

दरम्यान, दुवाची आई फरीन आणि वडील सादिक मकुभाई (कोल्हापूर) यांनी लालबागच्या गणपतीकडे एकनाथजी शिंदे हेच पुन्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असे साकडे घातले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संवेदनशिलतेमुळे हजारों रुग्णांचे प्राण वाचले आहेत. सुमारे तीनशे 22 कोटींचा निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून वितरीत करण्यात आलेला आहे. या कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सामजिक बांधिलकीचा वसा घेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यातील गरजू आणि गरीब रुग्णांना तत्परतेने निधी उपलब्ध करून दिला. जात, धर्म आणि पक्ष विरहित कार्य मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने उभे केले आहे. कोल्हापूरची चिमुकली दुवा या कक्षाची ब्रॅण्ड अम्बेसिडर झाली. केवळ दीड वर्षाची दुवा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची ब्रॅण्ड अम्बेसिडर हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. दुवाच्या आई-वडिलांनी चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला लालबाग गणपतीकडे पुन्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथजी शिंदे हेच विराजमान व्हावेत, असे साकडे घातले. दरम्यान, साकडे पूर्ण झाल्यास लालबागच्या गणपतीकडे नवस फेडण्यासाठी येऊ, अशी प्रतिक्रिया दुवाच्या आई-वडिलांनी दिली.

‘वर्षा’वर मिळाला दुवाला आरतीचा बहुमान

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची अवघ्या दीड वर्षाची ब्रॅण्ड अम्बेसिडर दुवाच्या आई – वडिलांनी आज, अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणेशाची आरती केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी चिमुकल्या दुवाची आत्मीयतेने विचारपूस केली. याप्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख प्रशांत साळुंखे यांची उपस्थिती होती.

Comment here