आपला जिल्हा

माजलगाव बाजार समिती एक दिवशीय लाक्षणिक संपावर

: सभापती जयदत्त नरवडे, उपसभापती श्रीहरी मोरे, सचिव हरिभाऊ सवणे

माजलगाव : राज्यातील सर्व बाजार समित्यांनी सोमवार, दि.७ ऑक्टोबर रोजी एक दिवशी लाक्षणिक संप पुकारला आहे. या अनुषंगाने माजलगाव बाजार समिती एक दिवस संपावर जाणार असल्याचे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे, उपसभापती श्रीहरी मोरे, सचिव हरिभाऊ सवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न मंडळ व महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी ग.दि.माडगूळकर नाट्यगृह निगडी, चिंचवड पुणे येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार होते. परंतु राज्य मंत्रिमंडळाची बैठक असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. राज्याचे पणन मंत्री म्हणून अब्दुल सत्तार हे परिषदेस उपस्थित राहण्याकरिता आले व राज्यातील बाजार समितीच्या प्रतिनिधीचे कोणतेही म्हणणे अडचणी, प्रश्न न ऐकता व त्यावर उपाययोजना न करता व शासनाचे मत न मांडता परिषदेच्या सभासदाळावरून निघून गेले. त्यामुळे आपल्या प्रश्नांचा विचार केला नाही म्हणून तेव्हा लगेच सभास्थानी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध करण्यात आला. सोमवार, दि.७ ऑक्टोबर रोजी एक दिवशीय राज्यातील सर्व बाजार समितीचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याच अनुषंगाने माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सर्व बाजार घटकांनी या एक दिवसीय लाक्षणिक संपामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सभापती जयदत्त नरवडे, उपसभापती श्रीहरी मोरे सचिव हरिभाऊ सवणे यांनी केले आहे.

Comment here