जैतापूर-देवठाणा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत गावात विविध विकास कामे सरपंच भागवत दराडे यांच्या कर्तव्य तत्परतेमुळे पुर्ण होत आहेत. रस्ते, वीज, पाणी आणि शिक्षण या विविध बाबींसाठी आमदार प्रकाश सोळंके व बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयसिंह सोळंके यांच्या माध्यमातून विकासकामांची गंगा आपल्या गावात आणण्यासाठी दराडे यांनी कसोशीने प्रयत्न केले आहेत. त्याचे फळ म्हणून गावात सदनता निर्माण होण्यास मदत झाली आहे. दराडे यांच्या गावाप्रती सजगतेमुळे प्रथमच आपण इतका मोठा निधी एका ग्रामपंचायतसाठी दिला असल्याचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मनोगतात व्यक्त केले. याप्रसंगी आमदार सोळंके, युवा नेते जयसिंह सोळंके यांचे देवठाणा-जैतापूर ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने सहृदय आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमास धारूर तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच पदाधिकारी उपस्थित होते.
जैतापूर येथील नदीवर गेटेड बंधारा, गावात सभामंडळ, देवठाणा येथे सभा मंडळ, सजगणित तांडा येथे शाळा खोली बांधकाम, शेरी तांडा येथे सिमेंट रस्ता, जैतापूर गावांतर्गत सिमेंट रस्ता, जैतापूर येथे पेव्हर ब्लॉक काम, नागझरी तांडा येथे सभामंडप आदी कामांचे लोकार्पण करण्यात आले. जैतापूर येथे रेल्वे स्टेशन ते जुना कुंडी फाटापर्यंत रस्ता व पुलाचे काम, जैतापूर ते सुकळी रस्त्यावरती जैतापूर गावाजवळ मोठा सिमेंट पूल, देवठाणा नदीवरील गेटेड बंधारा, जैतापूर येथे अंगणवाडी बांधकाम , देवठाणा ग्रामपंचायत कार्यालय इमारत, जैतापूर ते सुकळी रस्ता सुधारणा व जैतापूर येथे वाटर फिल्टरचा प्रोजेक्ट आदी कामांचे कार्यारंभ या एकूण ९ कोटी ७० लक्ष रूपयांच्या कामांचा कार्यारंभ व लोकार्पण सोहळा रविवारी झाला.
कार्यक्रमास उपस्थितांना मार्गदर्शन करताना सरपंच भागवत दराडे दिसत आहेत. याप्रसंगी आमदार प्रकाश सोळंके, युवा नेते जयसिंह सोळंके यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
Comment here