आपला जिल्हा

देशातील महिला अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा पारित करा : ॲड.आरती कांडूरे

माजलगाव : महाराष्ट्रात माँसाहेब जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर, माता सावित्रीमाई फुले, माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या लेकी सुरक्षित नसतील तर बेटी बचाव बेटी पढावो… नुसतेच नावाला का? असा सवाल उपस्थित करत देशातील महिला अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा पारित करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.आरती कांडूरे यांनी केली.

राज्यातील कायदा, सुव्यवस्था व प्रशासन सक्षमपणे चालवण्यासाठी व दिवसेंदिवस रोज माता भगिनी वरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी सभागृहात पन्नास टक्के महिला प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात माता सावित्रीमाईंच्या लेकी सुरक्षित नसतील तर बेटी बचाव….. बेटी पढाओ… नुसतेच नाव आला का? सभागृहात पन्नास टक्के महिला प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथील १३ वर्षीय खेळाडू मुलीवर व जालना जिल्ह्यातील आठ वर्षीय निरागस बालिकेवर अत्याचाराचा सर्वत्र जाहीर निषेध केला जात आहे. महिलांचे संरक्षण होण्यासाठी व पीडितांना न्याय देऊन नराधमांना कठोर शिक्षा करण्यासाठी व देशातील महिला अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा पारित करण्याची गरज असून शक्ती कायदा पारित करण्यासाठी सभागृहात पन्नास टक्के महिला प्रतिनिधित्व पाठवा, असे आवाहनही कायदेतज्ज्ञ ॲड.आरती कांडूरे-गाडेकर यांनी केले आहे.

Comment here