बीड : महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. लोककल्याणकारी योजना राबविल्याने महायुतीला बहुमत मिळाले, भविष्यातही राज्याचे हित पाहता एकनाथजी शिंदे यांनाच मुख्यमंत्री पदावर विराजमान करावे, अशी मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बीड जिल्हा प्रमुख महादेव मातकर यांच्यासह शेकडो निष्ठावंत समर्थकांनी केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना महायुतीला अभूतपूर्व असे यश प्राप्त झाले. महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा चेहरा समोर ठेवून महायुतीने निवडणूक लढविली. या निवडणुकीत जनतेने एक हाती सत्ता महायुतीला दिली. मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी विविध लोककल्याणकारी योजना राबवून थेट जनतेला लाभ मिळवून दिला. आपल्या केवळ अडीच वर्षाच्या कालावधीत अतिशय धडाकेबाज कामगिरी केली. त्यांच्या कामाची पावती मिळाली. राज्यात महायुतीला मोठे बहुमत मिळाले, या सर्व बाबीचा पुरेपूर विचार करून महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा राज्याची धुरा लोकनेते एकनाथजी शिंदे यांच्याकडे देत त्यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान करावे, अशी मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बीड जिल्हा प्रमुख महादेव मातकर यांच्यासह शरद झोडगे, कपिल जोगदंड, सतिश शेळके, दिलीप उढाण, आदी निष्ठावंत समर्थकांनी केली आहे.
महादेव मातकर
Comment here