श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांची माहिती
माजलगाव : सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थान माजलगावच्या वतीने येत्या सोमवार, दिनांक ०२ डिसेंबर २०२४ रोजी लिंगैक्य श्रीगुरू तपोरत्नं प्रभु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांच्या तृतीय जयंतीनिमित्त सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वीरशैव समाजातील सर्व लिंगायत व पोटजाती यांचा दुसरा वधू-वर परिचय मेळावा होणार आहे, अशी माहिती विद्यमान मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी दिली.
‘लोकहितं मम् करणीयम्’ या उक्तीप्रमाणे लिंगैक्य श्रीगुरू तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगाव यांचे तृतीय जयंती निमित्ताने श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली वीरशैव समाजातील सर्व लिंगायत व पोटजाती यांचा दुसरा वधू-वर परिचय मेळावा संपन्न होत आहे. सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठाचे पूर्वाचार्य लिंगैक्य प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांचा तृतीय जयंतीनिमित्त विविध धार्मिक विधी आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. ०२ डिसेंबर २०२४ सकाळी १० पासून ते सायंकाळी ०४ वाजेपर्यंत हा कार्यक्रम सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठ माजलगाव जि.बीड येथे होणार आहे. सकाळी ८ वाजता ते १० वाजता लिंगैक्य श्रीगुरू तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांचे समाधिस रूद्राभिषेक, १० वाजता आरती व श्रीगुरूंचे आशिर्वचन व नंतर सकाळी ११ पासून वधू-वर परिचय मेळाव्यास सुरूवात. या कार्यक्रमाला समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मठाधिपती श्री गुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी केले आहे.
‘समाजहितासाठी वधू-वर परिचय मेळावा आवश्यक’
सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थान माजलगावच्या वतीने यंदाही भव्य स्वरूपात वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातीतील वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. काळाबरोबर सामाजिक बांधिलकीचा वसा घेत मठातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आजमितीला समाजाच्या हितासाठी वधू-वर परिचय मेळावा आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी दिली.
वधू-वर परिचय मेळावा; नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा
वीरशैव लिंगायत वधू-वर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. समाज बांधवांनी वधू-वर परिचय मेळाव्यात सहभाग नोंदविण्यासाठी डॉ.गजाननआप्पा होन्ना (मो.9890486288), मनोहरअप्पा जामकर (मो.8275003152), कैलासआप्पा खुर्पे (मो.9921873321), राजाभाऊआप्पा लोखंडे (मो.9049948161), सुचेंद्रअप्पा महाजन (मो.8275003152), नितीनअप्पा शेटे (मो.9421162667), संजयअप्पा मोगरेकर (मो.9890718888), विकासआप्पा पाटील (मो.9637184708), प्रशांतआप्पा शेटे (मो.9175089898), रामेश्वरआप्पा काटकर (मो.9822141428), कैलासआप्पा लांडगे (मो.9175089898), सुरेशआप्पा कुरूळे (मो.8888268182) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठ माजलगावच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त वीरशैव लिंगायत समाज बांधव, महिला मंडळ माजलगाव यांनी केले आहे.
Comment here