आपला जिल्हा

मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी प्रकाश सोळंके यांना कॅबिनेट मंत्रिपद द्या 

सभापती जयदत्त नरवडे, उपसभापती श्रीहरी मोरे यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

माजलगाव : माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आमदार प्रकाश सोळंके यांनीच केला आहे. आणि विकासाचा जो बॅकलॉग राहिला आहे. तो पूर्ण करण्याची धमक ही आमदार प्रकाश सोळंके यांचीच आहे. त्यामुळे विकासपुरूष राज्याच्या मंत्रिपदाचा अनुभव असणाऱ्या प्रकाशदादांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करण्याची मागणी माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे, उपसभापती श्रीहरी मोरे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

माजलगाव विधानसभा मतदारसंघात विकासाची मुहूर्तमेढ माजी उपमुख्यमंत्री लोकनेते सुंदररावजी सोळंके यांनी रोवली आहे. तोच आदर्श आमदार प्रकाश सोळंके यांनी मतदारसंघात सुरू करून विकासाची गंगा या ठिकाणी ओढून आणली आहे. राज्यमंत्रिपदाच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी मतदार संघाचा कायापालट केला आहे. मंत्री पदाचा त्यांना अनुभव आहे. मतदारसंघात जो विकास झाला आहे, तो आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील मतदारांनी आमदार प्रकाश सोळंके यांना पाचव्यांदा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे. मागील ३० वर्षांमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांनी मोठ्या प्रमाणात विवीध विकासकामे केली आहेत. विद्यार्थ्यांचे, सुशिक्षित बेरोजगारांचे, त्याचप्रमाणे जलसिंचनाचे, अनेक प्रश्न मार्गी लावल्याने बहुतांशी शेतकरी आज समृध्द झाला आहे. विकासाचे अनेक कामे झाली आहेत. उर्वरित विकासाचा जो बॅकलॉग भरून काढायचा आहे, तोही आमदार प्रकाश सोळंकेच काढू शकतात. विकासाची दूरदृष्टी त्यांच्याकडे आहे. मंत्री पदाचा अनुभवही त्यांच्याकडे आहे त्यामुळे आमदार प्रकाश सोळंके यांना मंत्रिमंडळात समावेश करण्याची मागणी बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे, उपसभापती श्रीहरी मोरे यांनी शिष्टमंडळाद्वारे पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

सभापती जयदत्त नरवडे

उपसभापती श्रीहरी मोरे 

Comment here