माजलगाव : ज्येष्ठ पत्रकार, संपादक बाबा देशमाने यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई श्रीहरी देशमाने (वय 67) यांचे आज रविवार, दिनांक 29 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता निधन झाले. लक्ष्मीबाई देशमाने यांच्या पार्थिवावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेली दोन महिने लक्ष्मीबाई देशमाने यांच्यावर बीड येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून त्यांची ओळख होती. चाटगाव ता.धारूर जि.बीड येथे लक्ष्मीबाई देशमाने यांच्या पार्थिवावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीला पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. दरम्यान, मुंबई येथून प्रसिद्ध होणाऱ्या आरोग्यदूत मासिकाचे संपादक बाबा देशमाने यांच्या त्या मातोश्री होत्या. देशमाने कुटुंबियांवर कोसळलेल्या दुखाःत वर्तमान माध्यम समूह सहभागी आहे.
Comment here