आपला जिल्हा

श्री मंगलनाथ मल्टिस्टेटच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण

श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते प्रकाशन

माजलगाव : येथील श्री मंगलनाथ मल्टिस्टेटच्या दिनदर्शिकेचे शुक्रवारी माजलगाव मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती श्रीगुरू ष.ब.१०८ चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

शुक्रवारी संस्थेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कानडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. सभासदांना संस्थेच्या विविध योजनांची माहिती व्हावी व दिनदर्शिकेचा देखील लाभ सभासदांना घेता यावा करिता संस्था गेली २५ वर्षांपासून अखंडित परंपरागत दिनदर्शिकेचे प्रकाशन करत आहे. त्याचबरोबर सर्व सभासदांना ही दिनदर्शिका घरपोच दिली जाणार आहे. संस्थेचा ५५० कोटींपेक्षा अधिक व्यवसाय असून, ३११ कोटी ठेवी व २३२ कोटींपेक्षा अधिक कर्ज वाटप आहे. त्यामध्ये १२५ कोटींपेक्षा अधिक सुरक्षित सोनेतारण कर्ज वाटप आहे व एकूण कर्जाच्या ९९.०८ टक्के कर्ज हे सुरक्षित असल्यामुळे सभासदांच्या ठेवी सुरक्षित आहेत. संस्थेने स्थापनेपासून केवळ व्यवसाय वाढ व अधिकाधिक नफा मिळवणे हे उद्दिष्ट न ठेवता सभासद सेवा व सभासदांच्या ठेवींना सुरक्षितता या बाबींना नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापुढे देखील संस्था सुरक्षिततेला प्राध्यान्य देऊनच काम करणार आहे, असे आश्वासन दिले. याप्रसंगी संस्थेचे संचालक सुधाकर गुळवे, व्यवस्थापकीय संचालक ॲड रविंद्र कानडे, सरव्यवस्थापक दत्तात्रय भिसे, नारायण शेंडगे, सचिन कैलासे, राहुल काटकर, अमोल पांडे, विकास पाटील उपस्थित होते.

Comment here