रायगड : पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे जेष्ठ सुपूत्र युवराज संभाजी राजांचा १६ जानेवारी १६८१ रोजी किल्ले रायगडावर राज्याभिषेक संपन्न झाला आणि कर्तव्यनिष्ठ शंभूराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून सिंहासनाधिष्टीत झाले.
मागील अनेक वर्षे विस्मरणात गेलेल्या या राज्याभिषेक सोहळ्याला पुनश्च दिव्यत्व प्राप्त करून देण्यासाठी काही मोजके शिवशंभू पाईक एकत्र येत दि. १६ जानेवारी २०१४ रोजी शंभूछत्रपतींच्या या राज्याभिषेक सोहळ्याचा श्री गणेशा केला आणि तो आजही अव्याहत पणे शिवशंभू पाईक तसेच पुरातत्व विभागाच्या सहकार्याने चालू आहे. यंदा राज्याभिषेक सोहळ्याचे दशकपुर्ती महोत्सव, या नमित्ताने एका विशेष संकल्पनेच्या माध्यमातून हा सोहळा साजरा केला जाणार आहे तो म्हणजेच “क्रांतीसुर्य शंभूराजा”. स्वातंत्र्यलढ्यात आपल्या जिवाची तमा न बाळगता लढा देणाऱ्या क्रांतीकारकांच्या वंशंजाच्या हस्ते भारताच्या विविध राज्यातील पवित्र नद्यांच्या जलाभिषेकांने हा सोहळा संपन्न होणार आहे.
मागील दहा वर्षात स्वराज्यातील सरदारांचे वंशंज, समाजातील कर्तृत्ववान महिला, वारकरींच्या भक्ती-शक्ती स्वरूप, रायगडावर वर्षानुवर्ष वास्तव्यास असलेले मावळे,कुस्तीचा फड गाजविणाऱ्या मल्लांचा ‘मर्दानी राजा’, शेतकऱ्यांचा ‘पोशिंदा राजा’ या समाजातील विविध घटकातील मान्यवरांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होत आहे.
श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती फक्त १६ जानेवारीला रायगडावर संपन्न होणाऱ्या सोहळ्यापुरते मर्यादित नसून या माध्यमातून वर्षभर राज्यातील विविध भागात होणाऱ्या सामाजिक कार्यातही अग्रस्थानी आहे, यामाध्यमातून होणारे रक्तदान शिबीर, शैक्षणिक साहित्य वाटप, पूरपरिस्थित अन्नधान्याचे वाटप, वृक्षलागवड आणि संवर्धन हि सगळी सामाजिक कामे वाखाणण्याजोगी आहेत.
जलाभिषेकांचे मानकरी
1)श्री.किरण जीत सिंग हुतात्मा सरदार भगत सिंग यांचे पुतणे
2)श्री.अॅड.भाई सुभाष भगवानराव पाटील क्रांतीसिंह नाना पाटील यांचे नातू
3)श्री.सत्यशिल कमलाकर राजगुरू हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे नातू
4)श्री.सज्जनराव शामराव पाटील स्वातंत्र्य सैनिक गोवा मुक्ती संग्राम १९५५
5)श्री.गौरव किरण नायकवडी क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांचे नातू
6)श्री.दिग्विजय सर्जेराव जेधे स्वातंत्र्यसैनिक देशभक्त केशवराव जिथे यांचे पणतू
7)श्री.संजीव जावळे सशस्त्र क्रांतिकारक सार्वजनिक गणेशोत्सवाचे आद्य संस्थापक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे यांचे पणतू
Comment here