२५ हजार घरात पोहोचणार दिनदर्शिका
माजलगाव : तौफीकभैय्या पटेल युवा मंचच्या दिनदर्शिका- २०२५ चे लोकार्पण आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते केसापुरी येथील निवासस्थानी शुक्रवार, दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले. माजलगाव शहरासह तालुक्यात सुमारे २५ हजार घरांमध्ये ही दिनदर्शिका पोहचणार असल्याची माहिती माजलगाव नगर परिषदेचे माजी सभापती तौफीक पटेल यांनी आमदार यांना दिली.
यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह अच्युतराव लाटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयसिंग सोळंके, माजी सदस्य प्रा.प्रकाश गवते, माजी नगराध्यक्ष नासेर खाँ पठाण, रशिद बांबूवाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजी शेजुळ, माजी नगरसेवक सय्यद अहमेद, फारूक पटेल, एजाज शेख, फुलेपिंपळगावचे माजी सरपंच हमीद पटेल, नितीन शिनगारे, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार सोळंकेंनी तौफीकभैय्या पटेल युवा मंचच्या सामाजिक कार्याची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक देखिल केले.
Comment here