आपला जिल्हा

प्रतिभावंत नृत्यांगणा वैभवी टाकणखारचा असाही अनोखा सन्मान

तौफीकभैय्या पटेल युवा मंचकडून मदतीचा हात

माजलगाव : सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तौफीकभैय्या पटेल युवा मंचच्या वतीने प्रतिभावंत युवा नृत्यांगणा वैभवी टाकणखार हीस आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. या सामाजिक बांधिलकीचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

माजलगाव विधानसभा मतदारसंघात माजी सभापती तौफीक पटेल यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या तौफीकभैय्या पटेल युवा मंचच्या वतीने आजपर्यंत गरजू आणि गरजवंतांना वेळोवेळी मदतीचा आधार दिलेला आहे. माजलगावची सुकन्या आणि महाराष्ट्रातील प्रतिभावंत युवा नृत्यांगणा वैभवी कैलास टाकणखार हीने कलेच्या क्षेत्रात माजलगावचे नाव रोषण केले आहे. नुकत्याच नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनी झालेल्या परेडमध्ये सहभाग नोंदवून वैभवीने आपले नृत्य सादर केले. देशभरातील आलेल्या मान्यवर, प्रतिष्ठित नागरिकांनी वैभवीचे कौतुक केले. ही बाब समस्त माजलगावकरांसाठी अभिमानास्पद आहे, अशा शब्दांत माजलगाव नगर परिषदेचे माजी सभापती तौफीक पटेल यांनी प्रशंसा केली. वैभवीच्या कलेचा सन्मान म्हणून तौफीकभैय्या पटेल युवा मंचच्या वतीने आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. या आदर्श उपक्रमाचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे. दरम्यान, यावेळी वैभवीसह दयानंद स्वामी, कचरू खळगे, नारायण डक, विजय साळवे, माजी नगरसेवक शेख इम्रान, फारूक सय्यद आदींसह सामाजिक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

वैभवीच्या प्रतिभेचा सन्मान व्हावा : तौफीक पटेल 

समाजातील विविध घटकांमध्ये अनेक क्षेत्रात आपल्या प्रतिभेची अनेकांनी चुणूक दाखविली आहे. वैभवीने वेगळेपण सिद्ध केले आहे. सांस्कृतिक क्षेत्रात प्रतिभावंत नृत्यांगणा म्हणून वैभवीने राज्य आणि देशपातळीवर आपली छाप टाकली आहे. तीच्या कलेचे कौतुक व्हावे यासाठी तौफीकभैय्या पटेल युवा मंचने रोख रक्कम देवून सन्मान केला आहे, अशी माहीती माध्यमांशी बोलताना तौफीकभैय्या पटेल युवा मंचचे सर्वेसर्वा तौफीक पटेल यांनी दिली.

Comment here