माजलगाव : येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त तीन दिवसीय शंभो जागराचे आयोजन २४ ते २६ या दरम्यान करण्यात आले असून, सत्संग भजन संध्या, शिवशक्ती याग, हरिकीर्तन होणार आहेत.
सोमवार, दिनांक २४ फेब्रुवारी रोजी आर्ट ऑफ लिव्हिंगचे समन्वयक शरद डोल्हारकर यांची सत्संग भजन संध्या, मंगळवारी सकाळी ९ ते २ या वेळेत शिवशक्ती याग, सायंकाळी ७ ते ९ या वेळेत मल्हार शेळगावकर यांचे सांप्रदायिक हरिकीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी बुधवारी श्री सिध्देश्वरास अखंड २४ तास रूद्राभिषेक करण्यात येणार आहे. पहाटे ४, दुपारी १२ व रात्री १२ अशा तीन वेळेस महाशृंगार तर रात्री बारा वाजता विशेष भस्म आरती करण्यात येणार आहे. या तीनदिवसीय शंभो जागराचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सुकाणू समिती श्री सिध्देश्वर भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comment here