आपला जिल्हा

माजलगाव मठातर्फे २८ एप्रिल रोजी सामुहिक विवाह सोहळा

सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी यांच्या संजीवन समाधी उत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम; मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांची माहिती

माजलगाव : वीरशैव लिंगायत समाजाचे धार्मिक अधिष्ठान असलेल्या सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी यांच्या संजीवन समाधी उत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवार, दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी वीरशैव लिंगायत समाजातील तरूण-तरूणींच्या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यमान मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर यांनी दिली.

सिद्धयोगी शिवैक्य श्रीगुरू तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य माजलगावकर महाराज यांच्या प्रेरणेने वीरशैव लिंगायत समाजातील तरूण-तरूणींचा सामुहिक विवाह सोहळा होणार आहे. तरी वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातीतील विवाह इच्छुकांनी सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठ माजलगाव येथे शिवहारआप्पा महाजन (मो. 8275852898), राजाभाऊआप्पा लोखंडे (मो.9049948161), संजयआप्पा मोगरेकर (मो.9890718888) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहनही मठातर्फे करण्यात आले आहे. येत्या चैत्र अमावस्येला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात रविवार, दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी यांच्या संजीवन समाधी उत्सव सोहळ्यानिमित्त लघुरूद्राभिषेक, आरती व श्रीगुरूंचे आशिर्वचन होणार असून सोमवार, दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी वीरशैव लिंगायत समाजातील तरूण-तरूणींच्या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठातर्फे देण्यात आली आहे.

तपोरत्नं वैदिक पाठशाळेचे सलग २१ दिवस वर्ग

अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर बुधवार, दिनांक ३० एप्रिल २०२५ पासून ते मंगळवार, दिनांक २० मे २०२५ पर्यंत जंगम विद्यार्थ्यांसाठी तपोरत्नं वैदिक पाठशाळेचे शिबीर सलग २१ दिवस होणार आहे. यात शिबिरार्थी मुलांना दररोज प्रार्थना, रूद्राभिषेक आणि महापूजा करावयाची विधीचे मार्गदर्शन केले जाईल. त्यानंतर शिबिरार्थींना रूद्रपठणाचे अध्ययन केले जाणार आहे. आदर्श जीवन जगण्याची पध्दती याचे संस्कारही मुलांना दिले जातील. एकंदरीत वैदिक परंपरेतील विधी त्याचे महत्त्व आणि महात्म्य पटवून दिले जाईल. सलग २१ दिवस मुलांना गुरूजणांमार्फत सखोल अध्यात्म ज्ञान दिले जाईल, अशी माहितीही मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी दिली.

Comment here