माजलगाव : मंगळवारी माजलगाव शहरातील भरदुपार रक्तरंजित ठरली. भाजपा पदाधिकाऱ्याच्या हत्येने शहर अक्षरशः शहारले. दरम्यान, किट्टीआडगाव येथील भारतीय जनता पार्टीचे लोकसभा विस्तारक बाबासाहेब प्रभाकर आगे (वय ३५) हे जागीच गतप्राण झाले. याप्रकरणात आरोपीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन शरणागती पत्करली.
माजलगाव शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्र परिसरात आज दुपारी बायपासवर बाबासाहेब प्रभाकर आगे याचा हातात कोयता घेऊन नारायण शंकर फपाळ हा पाठलाग करत होता. आगे जिवाच्या आकांताने पळत पळत माजलगाव बसस्थानकापासून जवळच असलेल्या शाहूनगरकडे गेला. मात्र, तेथे जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर फपाळ याने बाबासाहेब आगे यास गाठले. त्यानंतर काही काळाच्या आत नारायण फपाळ याने बाबासाहेब आगे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले.
प्रत्यक्षदर्शीने नुसार फपाळ याने अगोदर पोटात वारकरून नंतर दोन वार डोक्यात केले. त्यानंतर फपाळ तेथून पसार झाला. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेतली. पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा करत पोलिसांनी बाबासाहेब आगे यास गंभीर जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे तपासून डॉक्टरांनी आगे याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान, हल्ला केल्यानंतर आरोपी नारायण शंकर फपाळ पोलिस ठाण्यात शरण आला. त्याने आगे याचा खून का केला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. मात्र, भर दिवसा रस्त्यावर हत्येच्या थरारक घटनेने माजलगाव शहर शहारले आहे.

आरोपी नारायण शंकर फपाळ



Comment here