माजलगाव : नगर परिषदेचे माजी सभापती तथा लोकहित फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तौफीक पटेल यांचा वाढदिवस मूक-बधिर निवासी विद्यालयातील चिमुकल्यांच्या साक्षीने साजरा करण्यात आला. दरम्यान, यावेळी लोकहित फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळांचे वाटप करण्यात आले.
नव्याने स्थापन झालेल्या आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लोकहित फाऊंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. माजलगाव नगर परिषदेचे माजी सभापती तौफीक पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त माजलगावस्थित जनार्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मूक-बधिर निवासी विद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थींना शालेय साहित्य आणि फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बाबा देशमाने, बालासाहेब फपाळ, फारूक पटेल, फेरोज सय्यद, भगीरथ तोडकरी, महेश बोटवे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूक-बधिर निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक थळपती होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगन्नाथ आगे, उत्तम पाटील, पी.पी.आगे, एस.आर.पवार, एम.डी.तोडकर, यु.आर.कोरडे, आर.आर.हारे, एस. झेड.मुटकुळे, एस.एस.काळे, एन.एच.काळे, तसेच शिक्षकेत्तर, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

तौफीक पटेल सामाजिक बांधिलकीचे प्रतीक
माजलगावच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तौफीक पटेल यांचे वेगळे स्थान आहे. त्यांनी आपला वाढदिवस मित्र परिवाराच्या संकल्पनेनुसार मूक-बधिर विद्यालयाच्या चिमुकल्यांसमवेत साजरा करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. त्यांना पुढील सामाजिक आणि राजकीय जीवनात मोठे यश मिळो, अशा शब्दांत विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक थळपती यांनी आपल्या मनोगतात सदिच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी बाबा देशमाने, बालासाहेब फपाळ, भगीरथ तोडकरी यांचीही भाषणे झाली.



Comment here