आपला जिल्हा

मच्छिमार बांधवांनी मासेमारी परवाना घ्यावा

अंकुश बलया यांचे आवाहन

माजलगाव : शासनाच्या मालकीच्या असलेल्या जलाशंयावर मासेमारीस मच्छिमार बांधवांना परवाने द्यावेत अशी मागणी कहार समाज संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अंकुश बलया यांनी केली होती. याची दखल प्रशासनाने घेत मासेमारी परवाने देण्यास सुरूवात केली असुन मच्छिमार बांधवांनी मासेमारी परवाना घ्यावा असे आवाहन अंकुश बलया यांनी केले आहे.

येथील माजलगाव धरणाचा मासेमारीचा ठेका दि.30 जून 2025 रोजी संपला असुन यापुढे संस्थेला ठेका न देता माजलगाव धरणात शासनाचा कर लावुन मासेमारी करण्यास कायमस्वरूपी परवाना पास द्या जेणे करून जलाशयावर मासेमारी करून मच्छिमार आपल्या कुटुंबीयांची उपजीवीका भागवुन ईतर ठिकाणी स्थलांतरीत होणार नाही अशी मागणी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मत्स्यालय कार्यालय मुंबई यांचेकडे कहार समाज संघटनेचे राष्ट्ीय महासचिव अंकुश बलया यांनी केली होती. याची प्रशासनाने दखल घेतली असुन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय बीड यांचेकडुन मच्छिमार बांधवांना मासेमारचा परवाना पास देण्यात येत आहेत. याचा सर्व मच्छिमार बांधवांनी तात्काळ लाभ घ्यावा जेणेकरून शासन जलाशयाचा ठेका देणार नाही असे आवाहन मच्छिमारांना अंकुश बलया यांनी केले आहे.

जास्तीत जास्त परवाने काढा

दिलेल्या निवेदनाची दखल घेतल्याबद्दल मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांचे मच्छिमार बांधवांच्या वतीने आभार मानले आहेत. परवान्यासाठी प्रति महिणा पाचश रूपये या प्रमाणे ठराव झाला असुन जास्तीत जास्त मच्छिमार बांधवांनी याचा परवान्याचा लाभ घ्यावा. कारण जास्तीत जास्त परवाने घेतल्यानंतर ठेका व टेंडर निघणार नाही. त्याचबरोबर परवानाधारक मासेमारी बांधवास शासनाकडुन नुकसान भरपाई तसेच जिवीत हानी झाल्यास कुटुंबाला शासनाकडुन लाभ मिळण्यास मदत होणार त्यामुळे जास्तीत जास्त मच्छिमार बांधवांनी परवाने पास काढुन घ्यावेत असे आवाहन भारतीय मच्छुवारा समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री अंकुश बलया यांनी केले आहे.

Comment here