माजलगाव : कोणत्याही समाजाची प्रगती शैक्षणिक गुणवत्तेवर ठरत असते. जीवनात सर्वांगिण प्रगती करावयाची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे समाजातील मुलामुलींनी शिक्षणाकडे आपले अधिक लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन श्री सद्गुरू मिस्किन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी आपल्या आशिवर्चनात केले, ते गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, या उत्सवाला अक्षरशः भक्तांची गर्दी उसळली होती.
गुरूपौर्णिमा उत्सव सोहळ्यात समाजातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थींनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. माजलगाव मठात गुरूपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. यावेळी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजलगाव मठाचा सर्वदूर लौकिक आहे. तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांनी जो आदर्श वसा आणि वारसा घालू दिला आहे. तो तत्परतेने पूर्ण करण्यास आपण बांधील आहोत, असे प्रतिपादन सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे विद्यमान मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी केले. गुरूंना भक्तांची निस्सीम भक्ती अपेक्षित असते. गुरूंची भक्ती मनोभावे करावी असे, आवाहन करत उपस्थित भक्तगणांना गुरूपौर्णिमेचे महत्व विषद केले. गुरूपौर्णिमेनिमित्त माजलगाव येथील श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यात प्रामुख्याने इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली.
या गुरूपौर्णिमा उत्सव सोहळ्यास समाज बांधवांना मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी आशीर्वचनपर भाषणातून मार्गदर्शन केले. पुढे बोलताना श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज म्हणाले, माजलगाव येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठातर्फे दरवर्षी वीरशैव लिंगायत समाजातील गरजू व गुणवंत ३८ विद्यार्थी-विद्यार्थ्यांनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. यावेळी वैदिक पाठशाळेचे अध्यापक शिवप्रसाद स्वामी (शास्त्री), किरण स्वामी यांच्यासह सहभागी शिबिरार्थींचा यथोचित सन्मान झाला. लिंगैक्य तपोरत्नं प्रभूपंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांनी समाजाच्या हितासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. तो वसा आणि वारसा आम्ही समर्थपणे पुढे चालवू शिक्षण हे जीवनात अमुलाग्र बदल घडविणारे माध्यम आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करून जीवनाचे सोने करावे, असे भावनिक आवाहनही श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी केले. गुरूपौर्णिमेनिमित्त माजलगाव येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठात विविध धार्मिक विधी पार पडल्या. समाजबांधवांकडून सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संजीवन समाधीस रूद्राभिषेक, लिंगैक्य तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांच्या समाधीस अभिषेक, श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांची पाद्यपूजा करण्यात आली. दरम्यान, या गुरूपौर्णिमा उत्सव सोहळ्याला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातुनही भक्तगणांनी हजेरी लावली होती. दरम्यान, उल्लेखनीय कार्याबद्दल तुकाराम येवले, उमेश मोगरेकर, बाबा देशमाने, आनंद डोंगरे, बालासाहेब फपाळ पाटील, भगीरथ तोडकरी यांचा सन्मान करण्यात आला.



मठाच्या ‘तपोरत्नं’चे लोकार्पण
सद्गुरू श्री मिस्किन स्वामी मठ संस्थानच्या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांची नोंद घेण्यासाठी ‘संस्काराचा समृद्धपाया तपोरत्नं’ या त्रैमासिकाची निर्मीती केली. श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या शुभहस्ते आज ‘तपोरत्नं’चे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ‘तपोरत्नं’ त्रैमासिकाबाबत महाराजांनी विशेष माहिती दिली. प्रकाशनाला महानंदा मल्टीस्टेटचे अध्यक्ष ओंकार खुर्पे, श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचे सीईओ रविंद्र कानडे, राजभाऊ लोखंडे, बाबा देशमाने, भगीरथ तोडकरी, आनंद तोंडुळे, संजय मोगरकर, विकास पाटील, आकाश काटकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.



Comment here