विधानभवन येथे आयोजित विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या संयुक्त बैठकीत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विविध पक्षांचे नेते व सदस्य उपस्थित होते. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाचे नियोजन, संभाव्य विधेयके, प्रश्नोत्तरांचा कालावधी तसेच विविध विषयांवरील चर्चेचा कार्यक्रम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर आगामी अधिवेशनात व्यापक चर्चा होणार असल्याचे संकेत बैठकीतून मिळाले.

मुंबईत २२ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; १० जुलैपर्यंत चालणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनाच्या कालावधीत राज्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची अपेक्षा असून कामकाजाचे नियोजन आणि कार्यक्रमाबाबत बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.


Comment here