माजलगाव : येथील माजलगाव पत्रिका या साप्ताहिकाचे संपादक तथा सुंदरराव सोळंके महाविद्यालयाचे प्राध्यापक एस.ए.सत्तार (वय ७२) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. प्रा.सत्तार यांनी माजलगाव पत्रिका साप्ताहिकाचे संपादक म्हणून तसेच १९८०-९० या काळात विभागीय दैनिकाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. याबरोबरच कम्युनिस्ट पक्षाचे देखील त्यांनी काम केले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी नुरानी मस्जिद, मोगल मोहल्ला येथील कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, एक बहिण, पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार असून, नगरपरिषदेचे माजी सभापती तौफिक पटेल यांचे ते वडील होते. पटेल यांच्या परिवारावर कोसळलेल्या दुखाःत वर्तमान माध्यम समूह सहभागी आहे.
प्रा.एस.ए.सत्तार यांचे निधन



Comment here