बीड : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले. मराठा आरक्षण लढाई निर्णायक टप्यावर आलेली असताना निगरगट्ट राज्य सरकारने आता समाजाचा अंत पाहू नये, असा इशारा लढा दुष्काळाशी चळवळीचे प्रणेते तथा मराठा आंदोलक ॲड.राज पाटील यांनी दिला आहे.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सुरवातीपासूनच सक्रिय असलेले ॲड.राज पाटील मुंबईत तळ ठोकून आहेत. मुंबईत लाखोंच्या संख्येने समाजबांधव एकवटले आहेत. ऊन वारा, पाऊस धारा याची कसलीही तमा न बाळगता आंदोलक मुंबईत ठाण मांडून आहेत. समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा,यासाठी हा लढा निर्णायक टप्प्यावर आलेला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार कडून वेळकाढू धोरण अवलंबिले जात आहे. ही अतिशय चीड आणणारी बाब आहे. सरकारमधील काही मंत्री, आमदार मराठा आरक्षण बाबत अगदी बेताल वक्तव्य करून दिशाभूल करत आहेत. हे थांबविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबंधिताना तंबी द्यावी, अशी मागणी ॲड.राज पाटील यांनी केली आहे.
मंत्री चंद्रकात पाटील यांनी अकलेचे तारे तोडू नयेत : ॲड.राज पाटील

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आरपारची लढाई लढत असताना सरकारमधील भाजपाचे नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणे शक्य नाही, असे अकलेचे तारे तोडून समाजात असंतोष निर्माण केला आहे. या मंत्री महोदय यांनी आरक्षण बाबत अकलेचे तारे तोडू नयेत, असा सल्ला ॲड.राज पाटील यांनी दिला आहे.



Comment here