माजलगाव ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पदावर होणार रूजू
माजलगाव : बीड जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून अतिशय प्रभावी कार्यकाळ राहिलेले डॉ.सुरेश साबळे यांना शासनाने नवसंजीवनी दिली असून त्यांची माजलगाव येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून आदेश दिले आहेत.
माजलगाव येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात सध्या कार्यरत असलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ.मोहन कट्टे यांची कारकीर्द वादळी राहिली असून ते नेहमी गैरहजर असल्याच्या अनेक तक्रारी जनतेतून होत्या. आता त्यांची शासकीय स्तरावर बदली झाली असून त्यांचे जागी रायगड येथून डॉ.सुरेश साबळे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. डॉ.सुरेश साबळे हे यापूर्वी देखिल माजलगाव येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी ते वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत होते त्यांचा कार्यकाळ येथे उत्कृष्ट राहिलेला असून त्यांच्या काळातच या रूग्णालयात एका महिन्यात ४५० महिलांच्या सिजर शस्त्रक्रिया झाल्या होत्या, त्याचप्रमाणे विविध राष्ट्रीय कार्यक्रम राबवून त्यांनी माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचे नाव उंचावले होते.कोरोना काळात देखील त्यांनी उत्कृष्ट असे कार्य करून अनेक कोरोना रुग्णांचे जीव वाचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर साबळे यांची बीड जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून नियुक्ती झाली होती त्या काळात त्यांनी उत्कृष्ट असे कार्य करून एक वेगळी शिस्त जिल्हा रूग्णालयात लावली होती त्यामुळे आजही त्यांचे जिल्हा भरात उत्कृष्ट प्रशासक म्हणून नाव आहे. मात्र बीड येथेच असताना काही राजकीय व्यक्तींनी त्यांच्या कार्यात खोडा घालून त्यांची रायगड येथे बदली करण्यात आली होती. आता त्यांची आरोग्य विभागाचे उपसचिव दीपक केंद्रे यांनी दिनांक १० रोजी एक आदेश काढून त्या अन्वये माजलगाव येथे डॉ.साबळे यांची नियुक्ती केली आहे, त्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



Comment here