महा-राष्ट्र

बाबा देशमाने संपादीत ‘संवाद’ वार्षिक अंकाचे नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रात प्रकाशन

नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार बाबा देशमाने संपादीत ‘संवाद २०२५’ या वार्षिक अंकाचे नवी दिल्ली स्थित महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागूल यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र आणि गोवा राज्यात आपल्या सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ पत्रकार बाबा देशमाने यांनी ‘संवाद २०२५’ या वार्षिक अंकाचे संपादन केले आहे. संवादचे प्रकाशन नवी दिल्ली येथे महाराष्ट्र परिचय केंद्रात संचालक हेमराज बागूल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संपादक बाबा देशमाने, लढा दुष्काळाशी चळवळीचे प्रणेते ॲड.राज पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश माने, उद्योजक सोनाजी बहिर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे नीलेश देशमुख आदींची उपस्थिती होती. ज्येष्ठ पत्रकार बाबा देशमाने यांनी संवाद हा वार्षिक दिवाळी अंक अतिशय दर्जेदार प्रसिद्ध केला असून दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर सेलिब्रिटी नट नट्याना प्राधान्य न देता सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी ॲड.राज पाटील यांना मानाचे स्थान दिले आहे, ही खरोखरच कौतुकाची बाब आहे.

मुखपृष्ठावर ॲड.राज पाटील यांना मानाचे स्थान

Comment here