माजलगाव : दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या काळापासून भाजपात सक्रिय असलेले नित्रुड येथील जेष्ठ भाजप नेते शेख चाँदसाब यांनी पक्षात मिळत असलेली सापत्न वागणूक व पक्ष नेतृत्वाकडून मिळत नसल्याने त्यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह आमदार प्रकाश सोळंके यांचे नेतृत्व स्वीकारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शेख यांच्या प्रवेशाने दिंद्रुड, नित्रुड जिल्हा परिषद गटात भाजपला मोठी खिंडार पडली असून, याचा फटका येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला बसेल अशा प्रतिक्रिया राजकीय जाणकार वर्तवत आहेत. दरम्यान, शेख चाँदसाब यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने दिंद्रुड परिसरात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
नित्रुड ता.माजलगाव येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व गेल्या अनेक वर्षांपासुन भाजप सक्रिय असलेले शेख चाँदसाब हे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे कट्टर व खंदे समर्थक म्हणुन माजलगाव मतदारसंघात परिचित आहेत. २०१७ च्या सार्वत्रिक जिल्हा परिषद निवडणुकीत शेख यांना दिंद्रुड जिल्हा परिषद गटातुन भाजपने उमेदवारी दिली होती. त्यात त्यांच्या अवघ्या कांही मतांनी निसटता पराभव झाला होता. या पराभवाने खचून न जाता शेख यांनी नव्या जोमाने व नव्या उत्साहाने पुन्हा आपले कार्य चालुच ठेवले होते. दरम्यानच्या काळात भाजप पक्ष नेतृत्वाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत त्यांचे कुठलेच प्रश्न मार्गी लागत नव्हते. तसेच या परिसरातील जनतेचे मुलभूत प्रश्न सोडवण्यास ही शेख यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आपल्या समर्थकांचे हित जोपासण्यासाठी व त्यांचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून माजलगाव मतदारसंघाचे विकासप्रिय नेतृत्व आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली कार्य करण्याचा निर्णय घेत त्यांनी रविवार दि.२ नोव्हेंबर रोजी आपल्या आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश केला. शेख चाँदसाब यांच्या प्रवेशाने भाजपाला मोठा राजकीय धक्का असुन, यामुळे भाजपला मोठी खिंडार पडल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत असुन, याचा फटका येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपला बसणार असल्याचा अंदाज राजकीय जाणकार वर्तवत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी ताकद मिळणार आहे.




Comment here