मराठा आंदोलक ॲड.राज पाटील यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी
नवी दिल्ली : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे समाजाचे भूषण आहेत. त्यांचे रक्षण करणे जसे समाजाचे कर्तव्य आहे तसेच ती महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारची जबादारी आहे. प्राप्त परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणी गांभीर्याने विचार करून मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी लढा दुष्काळाशी चळवळीचे प्रणेते तथा मराठा आंदोलक ॲड.राज पाटील यांनी केली आहे.
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा सर्वोच्च आहे. समाजाला आरक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे योगदान इतिहास विसरणार नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या जिविताची पूर्ण काळजी घेण्याची जबाबदारी समाजाने घेतली असली तरी राज्य, केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी ॲड.राज पाटील यांनी केली आहे.
रचलेल्या कटाची कसून चौकशी करा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती पुढे येत असल्याने राज्यात खळबळ उडाली असून समाजात चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हत्येच्या कटाची कसून चौकशी करून या प्रकरणाचा छडा लावावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ॲड. राज पाटील यांनी केली.



Comment here