आपला जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष, नगरसेवक पदाच्या उमेदवारी जाहीर

माजलगावकर साथ आणि समर्थन देतील : आमदार प्रकाश सोळंके 

माजलगाव : नगरपालिकेची रणधुमाळी सुरू असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाऱ्या आमदार प्रकाश सोळंके यांनी जाहीर करत नगरपालिका निवडणुकीत माजलगावकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ आणि समर्थन देतील असा विश्वासही आमदार सोळंके यांनी व्यक्त केला.

येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार प्रकाश सोळंके यांनी राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदासाठी अत्तार मेहरुनबी खलील पटेल यांचेसह तेरा प्रभागातील २६ नगरसेवक पदाच्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या. दरम्यान यावेळी माजलगाव नगरपरिषद ताब्यात असतांना शहरात केलेली स्वच्छता, पाणीपुरवठ्यासह विविध विकासकामांचा पाढा आमदार प्रकाश सोळंके यांनी वाचला. त्याचबरोबर आगामी काळात पालिका ताब्यात आल्यास निश्चितच भुमिगत नाल्या, आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न, नाट्यगृह उभारणीसह अनेक विकासकामे पुर्णत्वाकडे घेवून जाणार असल्याचे आमदार सोळंके यांनी सांगितले. यावेळी लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयसिंग सोळंके, नासेर पठाण, सभापती जयदत्त नरवडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी शेजुळ, नेते खलील पटेल, बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती कल्याण आबुज, माजलगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ.वसिम मनसबदार, अच्युत लाटे यांची उपस्थिती होती.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अत्तार मेहरुनबी खलील पटेल

उमेदवारीत या नावांची केली घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अत्तार मेहरुनबी खलील पटेल हे तर प्रभाग १ मध्ये रेखा सरोदे, मालती पाठक, प्रभाग २ मध्ये रत्नमाला साळवे, शेख इम्रान, प्रभाग ३ मध्ये राज सय्यद नूर, पठाण नाजिया खान, प्रभाग ४ मध्ये नवनाथ गायकवाड, कलावती फरके, प्रभाग ५ मध्ये मनिषा रेदासणी, राहुल लंगडे, प्रभाग ६ लता लाटे, शेख मजिद, प्रभाग ७ मध्ये वैशाली प्रशांत शेटे, विजय शिंदे, प्रभाग ८ मध्ये यास्मिन तांबोळी, शेख तौफिक, प्रभाग ९ मध्ये मोसिन जलील बागवान, सुनिता प्रल्हाद होके, प्रभाग १० मध्ये राधिका घाडगे, दिनकर होके, प्रभाग ११ मध्ये कोमल वारकड, मतीन शेख, प्रभाग १२ मध्ये उषा बनसोडे, सय्यद रफिक अली, प्रभाग १३ मध्ये सुदामती पौळ, रेहानाबी शेख यांच्या उमेदवाऱ्या जाहीर झाल्या आहेत.

Comment here