आपला जिल्हा

राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अर्जुन गायकवाड उमेदवार

खासदार बजरंग सोनवणे यांची अधिकृत घोषणा; धारूर नगरपरिषद निवडणुकीत रंगत

किल्लेधारूर : नगरपरिषद निवडणूक २०२५च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केली. यामध्ये नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अर्जुन काशिनाथ गायकवाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

या पत्रकार परिषदेस खासदार बजरंग सोनवणे, मोहनराव जगताप, युवराज लगड, गणेश थोरात, रवि शिनगारे, अक्रम जरगर, संतोष यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. किल्लेधारूर नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक पदासाठी उमेदवार म्हणून प्रभाग १ मध्ये अ) सर्वसाधारण महिला – उर्मिला शिवाजी ढगे, प्रभाग १ ब) सर्वसाधारण – शेख जिलानी दगडू, प्रभाग २ अ) अनुसूचित जाती महिला – रंजना विभीषण भालेराव, प्रभाग २ ब)सर्वसाधारण- सुरेश शामराव शेळके, प्रभाग ३ अ) अनुसूचित जाती महिला – मनिषा ज्ञानोबा सोनवणे, प्रभाग ३ ब) सर्वसाधारण – शेख अक्रम खय्युम जरगर, प्रभाग ४ अ) ओबीसी महिला – मिनाक्षी प्रकाश शेटे, प्रभाग ४ ब) सर्वसाधारण – बिभीषण काशिनाथ गायकवाड, प्रभाग ५ अ) ओबीसी (जाहीर नाही), प्रभाग ५ ब) सर्वसाधारण महिला- प्रमिला सुदामप्रसाद शुक्ला, प्रभाग ६ अ) सर्वसाधारण महिला – शकिलाबानो अतिक शेख, प्रभाग ६ ब) सर्वसाधारण – शेख शाहनवाज लतीफ, प्रभाग ७ अ) ओबीसी – विक्रम विलास ढोणे, प्रभाग ७ ब) सर्वसाधारण महिला – निलोफर अतिक मोमीन, प्रभाग ८ अ) ओबीसी महिला – रंजना जीवन पूजदेकर, प्रभाग ८ ब) सर्वसाधारण महिला – सुजाता रवी शिंगमारे, प्रभाग ९ अ) ओबीसी महिला – (जाहीर नाही), प्रभाग ९ ब) सर्वसाधारण महिला – गणेश बाबासाहेब थोरात, प्रभाग १० अ) अनुसूचित जाती – अंजनाव रवी गायसमुद्रे, प्रभाग १० ब) सर्वसाधारण महिला – अक्षय बप्पा वैरागे यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अर्जुन काशिनाथ गायकवाड

Comment here