आपला जिल्हा

पाच वर्षांच्या हृदित्य देशपांडेने केला गिरनार पर्वत सर

बीड जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव

माजलगाव : येथील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ.गजानन देशपांडे तसेच परळी वैद्यनाथ येथील सतिश कानेगावकर यांचे नातू हृदित्य तेजस देशपांडे याने अवघ्या पाचव्या वर्षी गुजरातमधील गिरनार पर्वतावर यशस्वी पायी चढाई करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

गुजरातमधील गिरनार पर्वतावरील श्रीदत्त पादुका दर्शनासाठी सुमारे दहा हजार पायऱ्या चढाव्या लागतात. हा प्रवास अत्यंत खडतर आणि दमछाक करणारा मानला जातो. मात्र एवढ्या लहान वयातही हृदित्यने हा संपूर्ण प्रवास स्वतःच्या पायावर पूर्ण केला. चढाईदरम्यान त्याच्यासाठी डोलीची व्यवस्था उपलब्ध होती, मात्र ती नाकारत हृदित्यने स्वतःच्या पायावरच पर्वत चढण्याचा ठाम निर्धार केला. हातात काठी घेत, न थकता आणि न डगमगता त्याने ही चढाई पूर्ण केली. या वेळी त्याच्यासोबत सुमारे ३० भाविक उपस्थित होते. हृदित्यच्या या धाडसी आणि प्रेरणादायी कामगिरीबद्दल बीड जिल्ह्यासह सर्वत्र त्याचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

Comment here