माजलगाव : बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत माजलगाव उपविभागात बुधवार, दिनांक 18 मार्च 2026 रोजी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हा जनता दरबार आयोजित करण्यात येत असून नागरिकांच्या तक्रारी व प्रलंबित प्रश्नांचे तात्काळ निवारण करण्यावर भर दिला जाणार आहे.
त्यानुसार, दि.18 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, माजलगाव येथे तसेच दुपारी 3.00 वाजता तहसिल कार्यालय, धारूर येथे जनता दरबार पार पडणार आहे. या दरबारात जिल्हाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या विविध तक्रारी व अर्जांवर संबंधित विभागांना तत्काळ कार्यवाहीच्या सूचना देणार आहेत. माजलगाव उपविभागातील नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी व मागण्यांबाबतचे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित ठिकाणी सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचे जलद व प्रभावी निवारण करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी सर्व संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रलंबित प्रकरणांची अद्ययावत माहिती व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी, माजलगाव यांनी या जनता दरबाराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.



Comment here