आपला जिल्हा

गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा!

बीडमध्ये उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा सुनेत्रा पवारांच्या हस्ते शुभारंभ

बीड : जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षिरसागर, आमदार विजयसिंह पंडीत, आमदार विक्रम काळे, पालक सचिव डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, पोलीस अधिक्षक नवनीत काॅवत, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता क्षाचे प्रमुख डॉ.सुधीर राऊत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दुर्धर आजारांवरील मोफत उपचारांसाठी आवश्यक आर्थिक मदत मिळवून देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली जाणार आहे. रुग्णालयात आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी रुग्णालय, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण भूमिका हा कक्ष पार पाडणार आहे. या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार असून शासनाच्या वैद्यकीय सहाय्य योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे.

Comment here