तुळजापूर : लिंगायत महासंघाच्या तुळजापूर येथे झालेल्या अधिवेशनामध्ये श्री मंगलनाथ मल्टिस्टेटचे व्यवस्थापकीय संचालक ॲड.रविंद्र कानडे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
लिंगायत महासंघद्वारा, तुळजापूर येथे दिनांक २२ मार्च रोजी आयोजित लिंगायत समाज अधिवेशन पार पडले. त्यामध्ये येथील श्री मंगलनाथ संस्थेला २५ वर्षे पूर्ण झालेल्या कार्याची दखल घेतली गेली. या संस्थेने समाजातील विविध दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य करून त्यांना आत्मनिर्भर आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य केले. त्याचबरोबर केवळ व्यवसायास प्राधान्य न देता सामाजिक बांधिलकी जपण्याचा उद्देश आखून सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहून समाज हिताची केलेल्या कार्याची दखल घेऊन लिंगायत महासंघाच्या वतीने अॅड.रविंद्र कानडे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष सुदर्शन बिरादार, धाराशिव जिल्ह्यातील महापौर, उपमहापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल कानडे यांचे अभिनंदन होत आहे.



Comment here