पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सतिष सावंत यांची माहिती
माजलगाव : सहकार क्षेत्रातील विविध संस्थासाठी येत्या १० ऑक्टोबर रोजी माजलगाव येथील शुभमंगल कार्यालयात जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजलगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सतिष सावंत यांनी ‘वर्तमान’शी बोलताना दिली.
माजलगाव तालुक्यातील सहकारी संस्थांना बळकटी मिळण्याच्या हेतूने माजलगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने रविवार, दि.१० ऑक्टोबर रोजी गढी रोडवरील शुभमंगल कार्यालयात सहकार क्षेत्रातील जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मार्केटिंग अॅण्ड मोटीवेशन, टेलिफोन मार्केटिंग, प्रोडक्ट/योजना, शेअर्स, डिपॉझिट, लोन, कस्टमर सर्व्हिस याबाबत लोणवळा येथील सुप्रसिद्ध को-ऑप ट्रेनर संदीप पाटील हे मार्गदर्शन करणार असून, जिल्हयातील व तालुक्यातील जास्तीत-जास्त सहकारी पतसंस्था, मल्टिस्टेट व सहकार क्षेत्रातील संस्थांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन सतीश सावंत यांनी केले आहे.
Comment here