आपला जिल्हा

रामेश्वर कानडे यांचा जीवन गौरव पुरस्काराने गौरव

माजलगाव : येथील श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष आर.जी.कानडे यांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कानडे यांनी मराठवाड्यातील अनेक तरूणांना श्री मंगलनाथ मल्टीस्टेटच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेत वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी मंत्री संजय बनसोडे, माजी खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार बाबासाहेब पाटील, महासंघाचे अध्यक्ष सुदर्शन बिरादार आदी उपस्थित होते. लिंगायत महासंघाच्या वतीने दिनांक २५ सप्टेंबर रोजी चौथा राज्यव्यापी वीरशैव लिंगायत वधू-वर परिचय मेळावा उदगीर याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. माजलगावातील श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष आर.जी.कानडे यांना माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सामाजिक कार्य व धार्मिक कार्यात रूची असणारे आर.जी.कानडे साहेब हे मूळ रहिवासी कुंभारी पिंपळगावचे आहेत. समाज सेवा हीच ईश्वर सेवा आत्मसात करून त्यांनी श्री मंगलनाथ मल्टीस्टेटची स्थापना केली संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यातील शेकडो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यांना यापूर्वी तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सहकाररत्न, सहकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या यशस्वी जीवन व सहकार पूरक जीवनशैलीची दखल घेत वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सदरील कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांतजी खैरे तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी राज्यमंत्री तथा आमदार संजय बनसोडे, दिव्य सानिध्य मठ संस्थान उदगीरचे श्री शंभूलिंग शिवाचार्य महाराज, लातूरचे माजी खासदार सुधाकर श्रृंगारे, माजी आमदार बाबासाहेब पाटील, लिंगायत महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुदर्शन बिरादार, विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर तसेच मोठ्या संख्येने लिंगायत समाज बांधव या कार्यक्रमास उपस्थित होते.

Comment here