आपला जिल्हा

शेख मंजूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य दणका मोर्चा

उपविभागीय कार्यालयात दिले विविध मागण्यांचे निवेदन; महिलांच्या लक्षणीय हजेरी

माजलगाव : शहरातील कचारवाडा, पावर हाउस रोडसमोरील भाग, दावल मलिक, बरकत नगर, ईदगाह मोहल्ला, जुना बाजार रोड, इंदिरा नगर, तकीया, बिलाल मोहल्ला, कुरेशी गल्ली, आझाद नगर, गौतम नगर, रमाई नगर याठिकाणच्या रहिवाशांना मुलभूत सुविधा पुरवाव्यात यासह विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्या नेतृत्वाखाली दणका मोर्चा आज गुरूवार, दिनांक २९ सप्टेंबर रोजी काढण्यात आला.

या सर्व भागातील रहिवाशी मागील ३० ते ४० वर्षांपासून रहिवाशी आहेत. परंतु त्यांना मालकी हक्काचे कोणतेही कागदपत्रे नसल्याने शासकीय योजनापासुन ते वंचित राहतात. मतदार असतांनाही पालिकेचे त्यांचेकडे दुर्लक्ष आहे. शासकीय योजना त्यांना मिळाव्यात तसेच पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना याचा लाभ मिळावा, रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी, विद्युत कनेक्शनसह अनेक मुलभुत सुविधांचा याठिकाण अभाव आहे. त्यामुळे त्यांना पालिकेने मुलभुत सुविधा पुरवाव्यात, पालिकेकडे २०२०-२१ मध्ये घरकुलासाठी अर्ज भरले असुन त्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी द्यावी, नगर परिषदेच्या तेरा एकर जमीनमध्ये म्हाडा योजनेअंतर्गत या बेघर कुटूंबियांसाठी घरकुले बांधून द्यावीत, शहराच्या लोसंख्येनुसार नविन जोड स्वस्त धान्य दुकान स्थापन करून स्वस्त धान्य वितरण करा, या भागातील घरकुल धारकांचे हप्ते खात्यावर जमा करा, शहरातील प्रभागातील लहान बालके शिक्षणापासुन वंचित राहू नयेत म्हणुन प्रत्येक प्रभागात दोन अंगणवाडी/बालवाडी स्थापन करा या मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर माजी नगराध्यक्ष शेख मंजुर यांच्या नेतृत्वाखाली दणका मोर्चा काढण्यात आला व मागण्यांचे निवेदन उपविभागीय कार्यालयातील तहसिलदार निळेकर यांना देण्यात आले. यावेळी नौमान चाऊस, शकील कुरेशी, मौलाना इंद्रिस बागवान, टी.आर.जावळे, शेख मुस्तफा जीवन जाधव, शाहू डोंगरे, प्रकाश निरडे, सलिम पठाण, हाफेज मोसिन, राम भोले, शेख निसारमामू, फिरोज कुरेशी, मोजम कुरेशी,शे.नूर टेलर, नवीद सिद्दिकी, असिम पटेल, शेख दिलावर, अनिल राठोड, शे.गफ्फार, राणा कुरेशी, मुस्ताक शे.शेख मुजाहिद्दीन, पेंटर दिग्रसकर, कमलबाई वाघमारे, प्रियंका भोसले, केसरबाई निरडे, मीनाक्षी शिंदे, राधा सुळ यांच्यासह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

 

Comment here