भाई अॅड.नारायण गोले पाटील यांचे आवाहन
माजलगाव : जागर रयतेचा लढा मातीचा विचार स्वराज्याचा या अभियानाचा दुसरा भाग म्हणून खरात आडगाव येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाची सुरूवात शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बीड जिल्हाभर सुरू असलेल्या जागर रयतेचा लढा मातीचा विचार स्वराज्याचा या अभियानाची दुसरी सभा खरात आडगाव येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर बोलतांना शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा समाचार घेतला व शहीद भगतसिंगाचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या तरूण मुलांनी शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडा घेऊन लढले पाहिजे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई अॅड. नारायण गोले पाटील यांनी केले. यावेळी भाई मुंजा पांचाळ यांनी शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होऊन देखिल सुलतानी सरकार शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचे पाप करत असल्याचे मत व्यक्त केले. तर भाई आसाराम खडूळ, भाई दासू शेरकर, भाई लक्ष्मण चव्हाण, भाई राजभाऊ कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना शेतकरी कामगार पक्षाच्या कार्याला उजाळा दिला. त्यावेळी भाई विष्णू शेळके, भाई राजेभाऊ शेरकर, भाई मुकेश शेरकर, भाई मारुती हांडे, भाई साळोजी हांडे, भाई दाशीराम शेरकर, भाई लक्ष्मण चव्हाण, भाई बाळू आठवे, भाई दत्ता तांगडे, चंद्रकांत कांबळे, उद्धव आठवे, सुरज नायबळ, अशोक कुलकर्णी, मयूर पांचाळ, चांगदेव शेजुळ, ज्ञानेश्वर आढाव, किशोर पांचाळ, सतीश शेजुळ, लहु शेजुळ, अशोक आढाव, राजेभाऊ शेजुळ, आकाश शेळके, राजेभाऊ जाधव, माजी सरपंच शिवाजीराव आढाव, शहाजी जाधव, कौस्तुभ जोशी, आनंत गिराम, बालासाहेब आढाव, गणेश शेजुळ, वैभव पांचाळ, दिलीप शेजुळ, अंगद रासवे, बाबु शेळके आदिंसह शेकडो शेतकरी बांधव उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर आढाव यांनी तर आभार प्रदर्शन सतीश शेजुळ यांनी केले.
Comment here