मुंबई : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी बीड जिल्ह्यातील पत्रकार बाबा श्रीहरी देशमाने यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई राज्य कार्यकारिणीच्या शिफारशीनुसार आणि प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मान्यतेने पत्रकार संघाच्या वाढीसाठी बाबा देशमाने यांची राज्य कार्यकारिणी सदस्यपदी प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी पत्राद्वारे निवड केली आहे. बाबा देशमाने यांचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत. देशमाने हे मूळ चाटगाव ता.धारूर जिल्हा बीड येथे येथील रहिवाशी आहेत. त्यांनी आपलं महानगर दैनिकात प्रशिक्षणार्थी उपसंपादक, मराठवाडा साथी दैनिकात उपसंपादक, दैनिक पुढारी गोवा आवृत्तीमध्ये उपसंपादक आणि पणजी शहर प्रतिनिधी, दैनिक हेराल्डमध्ये मुख्य उपसंपादक, दैनिक गोवादूतमध्ये वरिष्ठ उसंपादक अशा विविध पदांवर काम केले आहे. देशमाने यांच्या निवडीबद्दल राज्यासह जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.
Comment here