खासदार डाॅ.प्रितम मुंडे या घटनास्थळी दाखल
बीड : महाराष्ट्रमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी होत असताना बीडमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बीडचे भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वतःला गोळी झाडून आज मंगळवार, दिनांक ११ ऑक्टोंबर सकाळच्या सुमारास आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून तातडीने पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भगीरथ बियाणी यांनी आपल्या राहत्या घरीच स्वतःला गोळी झाडत आत्महत्या केली. त्यांना लगेच शहरातील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. या घटनेचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे. पण भागीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली याबद्दल अद्याप संभ्रम कायम आहे. दरम्यान, या घटनेमुळे भाजपमध्येही खळबळ उडाली असून खासदार डाॅ.प्रितम मुंडे या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Comment here