आपला जिल्हा

वीज वितरण कंपनीला जाग

संगम दलीत वस्तीच्या मागण्या मान्य; आमरण उपोषण घेतले मागे

तेलगाव : धारूर तालुक्यातील संगम येथील दलीत वस्ती 2 महिन्यांपासून अंधारात होती. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या तेलगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर भीम आर्मी संघटना आणि दलीत वस्तीतील नागरिकांनी मंगळवार आमरण उपोषण केले. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य केल्याने उपोषण मागे घेतले.

धारूर तालुक्यातील संगम येथील दलीत वस्ती गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण अंधारात आहे. दलीत वस्तीतील नागरिकांनी वीज बिलेही भरलेली आहेत. मात्र मनमानी कारभाराचा कळस गाठल्याने संगम येथील दलीत वस्तीवर अन्याय होत होता. या अन्न्यायाला वाचा फोडण्यासाठी भीम आर्मी संघटना आक्रमक झाली. दलीत वस्तीतील नागरिक आंदोलनातून विचारला. आंदोलनाच्या दणक्याने वीज वितरण कंपनीला जाग आली. त्यांनी मागण्या मान्य केल्या.

वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण वस्ती अंधारात होती. हा घोर अन्न्याय आहे, संगम ग्रामस्थांच्या विविध प्रश्नंसंदर्भात आगामी काळातही आंदोलन उभारणार असल्याचे युवा नेते अविनाश गवळी यांनी सांगितले. या आंदोलनाला भीम आर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मायंदळे, सरपंच भगवान कांदे, उपसरपंच सचिन रायकर, माजी सरपंच ज्ञानेश्वर होरमाळे, राम उबाळे, अतुल चव्हाण, इम्रान शेख, रामभाऊ आरसुल, प्रकाश सोनवणे, आश्विनकुमार डावरे, बाळासाहेब सोनटक्के, हर्षवर्धन वावळकर आदींनी उपोषणाला पाठिंबा दिला. युवा नेते अविनाश गवळी यंच्या नेतृत्त्वाखाली केलेल्या आंदोलनात दीपक मस्के, कृष्णा कांबळे, संजय सौंदरमल, संभाजी सौंदरमल आदींनी सहभाग घेतला.

Comment here