आपला जिल्हा

भीम आर्मीचा चला रक्ताचे नाते जोडूया संदेश

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी अनोखी मानवंदना

माजलगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम आर्मी, भारत एकता मिशन, संगम शाखेतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करुन चला रक्ताशी नाते जोडूया हा संदेश देण्यात आला. दरम्यान, 66 रक्तदात्यांनी रक्तदान करून 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना दिली.

भीम आर्मीचे बीड जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मायंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध रचनात्मक उपक्रम राबविले जात आहेत. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संगम येथे मंगळवार 6 डिसेंबर रोजी रत्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन दिंद्रुड पोलिस स्टेशनचे पी.एस.आय. ज्ञानेश्वर राडकर यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिर संगम येथील भीमनगर परिसरात घेण्यात आले.या रक्तदान शिबिराचे आयोजन, संयोजक धारूर तालुका भीम आर्मी उपाध्यक्ष कृष्णा कांबळे यांनी केले होते. यावेळी सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर होरमाळे, माजी सरपंच भगवान कांदे, माजी सैनिक विलास डापकर, पत्रकार बाबा श्रीहरी देशमाने, युवा नेते अविनाश गवळी, रामभाऊ आरसुळ, संकल्प मिलिटरी कॅम्पचे संचालक संदीप तिडके, डीपीआयचे तालुका अध्यक्ष नवनाथ कांबळे,

पँथर नेते संभाजी सौंदरमल, सामाजिक कार्यकर्ते दीपक मस्के, अतुल चव्हाण, सुनील वावळकर, बालासाहेब सोनटक्के आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेणुका ब्लड बँकेचे बिभीषण सांगळे, आकाश वाघमारे, अक्षय बडे, भीम आर्मी संगम शाखा अध्यक्ष आकाश तायडे, बाळासाहेब सौंदरमल, अशोक सौंदरमल, अर्जुन भाग्यवंत, ओंकार चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

Comment here