युवा नेते गोविंद भैय्या केकान यांची ग्वाही
धारूर : तालुक्यातील चाटगाव ग्रामपंचायतीत परिवर्तन झाले असून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले भाजपचे युवा नेते तथा जी.के.फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेचे अध्यक्ष गोविंद महादेवराव केकान हे सरपंचपदी विराजमान झाले आहेत. दरम्यान, चाटगावकरांनी जो विश्र्वास दाखवला त्याच्या मी आदर करून आपल्या विश्वासाला कदापीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही केकान यांनी दिली.
विकासाचा अजेंडा घेऊन जनशक्ती ग्रामविकास आघाडीने युवा नेते गोविंद केकान यांच्या नेतृत्वाखाली चाटगाव ग्रामपंचायत निवडणूक लढविली होती. सरपंचपदाच्या उमेदवार गोविंद केकान यांच्या मातोश्री मंडाबाई महादेवराव केकान या विजयी झाल्या. सरपंचपदाच्या उमेदवारासह जनशक्ती ग्रामविकास आघाडीचे 5 उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांमध्ये तरुण तडफदार कार्यकर्ते सुदाम वसंत केकान, माजी सरपंच भागाबाई नामदेव सांगळे, गंगाबाई ज्ञानोबा सांगळे, नवनाथ तुकाराम पोटे हे विजयी झाले. युवा नेते गोविंद केकान यांनी स्वतंत्र पॅनल उभा करून युवकांची मोठी फळी बांधण्यात यशस्वी झाले. गावाच्या सर्वांगीण विकासाचा जाहीरनामा तयार करून प्रभावी प्रचार यंत्रणा राबविली. जनशक्ती ग्रामविकास आघाडी विजयी करण्यासाठी ग्रामस्थ, युवक आणि जी.के.फाउंडेशनच्या पदाधिकऱ्यांनी परिश्रम घेतले.
चाटगाव राज्यात रोल मॉडेल बनविणारच
सरपंचपदासह 5 उमेदवार निवडून दिल्याबाबत ग्रामस्थांशी संवाद साधताना पॅनल प्रमुख गोविंद केकान यांनी जाहीरनाम्यात नमुद केलेली सर्व कामे करण्यास आपण बांधिल असल्याची ग्वाही दिली. येणाऱ्या काळात गावाचा सर्वांगीण विकास करतानाच चाटगाव हे राज्यात रोल मॉडेल बनविणारच असे अभिवचन दिले. यावेळी बाबा देशमाने, दीपक सांगळे यांनीही आपले विचार मांडले. प्रारंभी चाटगावचे जावई, बीड जिल्ह्याचे पहिले टिक टॉक स्टार संतोष मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
Comment here