वादाशिवाय मंदिराचे काम पूर्ण करण्याची गावकऱ्यांची ग्वाही
माजलगाव : तालुक्यातील ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या पुरूषोत्तमपुरी येथील भगवान पुरूषोत्तम मंदिराला मंगळवार, दि.११ एप्रिल रोजी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट दिली. दरम्यान, भगवान पुरूषोत्तम मंदिराच्या जिर्णोध्दारापूर्वी आणि मंदिराचे काम पूर्ण होईपर्यंत भगवान पुरूषोत्तमाची मूर्ती स्थलांतरित करण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी देवस्थानात सपत्नीक पूजा केली. मंदिराचे काम अतिशय दर्जेदार करण्यात येणार आहे. कोणत्याही वादविवादाशिवाय काम पूर्णत्वास जाईल याची खबरदारी ग्रामस्थांनी घेतली आहे. मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवण्यापूर्वी स्थानिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी किंवा घरकूल मंजूर किंवा इतर योजनांना देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
Comment here