मंगेश चिवटे, रामहरी राऊत यांची मुंबईत घोषणा
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या मराठवाडा विभागीय प्रसिद्धी प्रमुखपदी भगीरथ तोडकरी यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान, याबाबतची घोषणा नुकतीच मुंबई येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत यांनी केली.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक कार्य करत आहे. प्रारंभापासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाशी संबंधित असलेले पत्रकार भगीरथ तोडकरी यापूर्वी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माजलगाव तालुका समन्वयकपदी कार्यरत होते. रूग्णसेवा आणि माध्यम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहून भगीरथ तोडकरी यांच्यावर मराठवाडा विभागीय प्रसिद्धी प्रमुख म्हणून नवी जबाबदारी सोपविली आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कोपरी-ठाणे येथील मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य प्रमुख रामहरी राऊत आणि सहकक्ष प्रमुख ज्ञानेश्वर धुळगंडे यांनी नियुक्तीपत्र दिले. याप्रसंगी ‘आरोग्यदूत’चे संपादक बाबा श्रीहरी देशमाने, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डाॅक्टर सेलचे नाशिक जिल्हाप्रमुख प्रथमेश पाटील, गजानन नरलावार उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्व स्तरातून भगीरथ तोडकरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comment here