श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराजांचा ‘आरोग्यदूत’ला शुभसंदेश
माजलगाव : सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठाचे मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर यांनी आरोग्यदूत मासिकाचे कौतुक करताना आरोग्यदूत टीम विधायक काम करत आहे. सकारात्मक कामातून ऊर्जा मिळते, असा शुभसंदेश दिला.
आरोग्य क्षेत्राला वाहिलेल्या महाराष्ट्रव्यापी आरोग्यदूत मासिकाचा अंक श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांना भेट देण्यात आला. याप्रसंगी महाराजांनी आरोग्यदूत उपक्रमाबद्दल आणि महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोग्य क्षेत्रातील कामाची प्रशंसा केली. आरोग्यदूत मासिकाच्या माध्यमातून समाजातील गरजवंतांना वैद्यकीय लाभ मिळवून देण्यासाठी जनजागृती होईल. ‘आरोग्यदूत’चे कार्य सकारात्मक आहे. कोणत्याही सकारात्मक कार्यातून निश्चित ऊर्जा निर्माण होते. महाराजांनी आरोग्यदूत टीमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. संपादक बाबा श्रीहरी देशमाने, सहसंपादक भगीरथ तोडकरी यांनी महाराजांशी शनिवारी संवाद साधला.
Comment here