महा-राष्ट्र

‘आरोग्यदूत’ मासिक नव्या रचनात्मक पत्रकारितेचे प्रतीक : मुख्यमंत्री

मुंबई : आरोग्यदूत हे मासिक नव्या रचनात्मक पत्रकारितेचे प्रतीक आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र राज्याचे संवेदनशिल मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी कौतुक केले.

मंत्रालय, मुंबईत आरोग्यदूत मासिकाच्या माहे मे 2023 अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशनाला अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, आमदार सर्वश्री संजय शिरसाठ, किशोर पाटील, राहुल ढिकले, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, आरोग्यदूतचे मुख्य संपादक बाबा देशमाने, सहसंपादक भगीरथ तोडकरी आदींची उपस्थिती होती. आरोग्यदूत हे अतिशय दर्जेदार, सकारात्मक उपक्रमांना प्राधान्य देणारे मासिक आहे. आरोग्यदूतचे संपादकीय सल्लागार मंगेश चिवटे, संपादक बाबा श्रीहरी देशमाने यांच्यासह सर्व टीमचे कौतुक करून आगामी वाटचालीला मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या प्रकाशनाचे वृत्त मुख्यमंत्री महोदय यांच्या अधिकृत CMO Maharashtra या फेसबुक आणि ट्विटरवरून प्रसारीत करण्यात आले.


( छायाचित्रे साभार : शरद सावंत )

Comment here