कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी जयदत्त नरवडे, तर उपसभापतीपदी श्रीहरी मोरे
माजलगाव : उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जयदत्त नरवडे तर उपसभापतीपदी श्रीहरी मोरे यांची वर्णी लागली आहे. दरम्यान, नव्या चेहर्यांना संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात असताना आमदार प्रकाश सोळंके यांनी निष्ठावंतांना मानाचे स्थान दिले असल्याचे बोलले जात आहे.
माजलगाव येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रविवारी झालेल्या निवडीत सभापती म्हणून राष्ट्रवादीचे जयदत्त नरवडे तर उपसभापती म्हणून श्रीहरी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात मागील २० वर्षांपासून बाजार समिती आहे, त्यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत १८ पैकी १२ जागा जिंकून बहुमत मिळवले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात रविवारी सहाय्यक निबंधक विकास जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडीसाठी सर्व सदस्यांची बैठक झाली. त्यावेळी राष्ट्रवादीकडून जयदत्त नरवडे व श्रीहरी मोरे यांनी तर भाजपकडून नितीन नाईकनवरे व मनोज जगताप यांनी सभापती व उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केले होते. त्यातील नितीन नाईकनवरे व मनोज जगताप यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने सभापती म्हणून जयदत्त नरवडे व उपसभापती म्हणून श्रीहरी मोरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर आमदार प्रकाश सोळंके, माजी सभापती संभाजी शेजुळ, कल्याण आबुज यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून अभिनंदन केले. निवडीनंतर आमदार प्रकाश सोळंके, चंद्रकांत शेजुळ, कल्याण आबूज, माजी सभापती संभाजी शेजुळ यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून अभिनंदन केले.
नवनिर्वाचित सभापती जयदत्त नरवडे
नवनिर्वाचित उपसभापती श्रीहरी मोरे
Comment here