आपला जिल्हा

‘रघुप्रयाग अर्बन’चा चतुर्थ वर्धापनदिन उत्साहात 

श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराजांची उपस्थिती लाभली

माजलगाव : येथील सामाजिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणाऱ्या रघुप्रयाग अर्बनचा चौथा वर्धापनदिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठाचे मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून शुभआशीर्वाद दिले.

याप्रसंगी रघुप्रयाग अर्बनचे अध्यक्ष सागर खुर्पे यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल मनोगत व्यक्त केले. पुढे सागर खुर्पे म्हणाले, रघुप्रयाग अर्बनने अल्पावधीत लक्षवेधी प्रगती केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात संस्थेने ४० कोटी रूपयांचा व्यवसाय केला आहे. संस्थेला १८ लाख रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्या दृष्टीने रघुप्रयाग अर्बनला ऑडीट वर्ग ‘अ’ अधिकचा दर्जा प्राप्त झाला आहे. संस्था दमदार वाटचाल करीत पाचव्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे, याचे श्रेय माझ्या कर्मचारी वर्गाला आणि ग्राहकांना जाते, असे खुर्पे म्हणाले. या वर्धापनदिनाला संस्थेचे सभासद, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक आणि आप्तस्वकीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

‘रघुप्रयाग अर्बनची वाटचाल विश्वासाच्या जोरावर’

रघुप्रयाग अर्बनने पाचव्या वर्षात पदार्पण केल्याच्या पार्श्वभूमीवर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संगिता खुर्पे-पांडे म्हणाल्या, कोणतीही संस्था सचोटी आणि विश्वासाच्या जोरावर पुढे जात असते. रघुप्रयाग अर्बन संस्थेने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे, तो यापुढेही सार्थ ठरवू अशी ग्वाही संगिता खुर्पे-पांडे यांनी दिली.

Comment here