माजलगावातील महासत्संग मेळाव्यात अण्णासाहेब मोरे यांचे प्रतिपादन
माजलगाव : संस्कार जपले तरच आपली संस्कृती टिकेल, असे प्रतिपादन अखिल अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूकुल पीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले. ते माजलगाव येथे महासत्संग मेळाव्याला मार्गदर्शन करत होते.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे आयोजित महासत्संग मेळाव्यात पुढे बोलताना म्हणाले, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल व धर्म टिकला तरच देश टिकेल, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील बालसंस्कार वर्गातून आदर्श नागरिक घडविण्याचे काम केले जाते तसेच मानवी आरोग्य, वैदिक तत्वज्ञान, कृषिशास्त्र, पर्यावरण अशा विविध विषयावर मार्गदर्शन आपल्या हितगुजातून केले. या महासत्संग मेळाव्याची सुरूवात दीप प्रज्ज्वलन करुन झाले यावेळी वधू वर नोंदणी अभियान तसेच रोजगार मेळावा, मराठी अस्मिता सणवार व्रत मांडणी, कृषि विभागाचे स्टॉल तसेच जनकल्याण माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते.
या महासत्संग मेळाव्यात आमदार प्रकाश सोळंके यांनी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची आपल्या मनोगतातून प्रशंसा केली. या महासत्संग मेळाव्याचे प्रास्ताविक डॉ.यशवंत राजेभोसले यांनी केले. यावेळी मोहनराव जगताप, नितीन नाईकनवरे, संतोष यादव, सुशिल सोळंके, माजी आमदार मीराताई रेंगे, सिमाताई खोतकर, स्वरुपाताई पंडित, पत्रकार, डॉक्टर, बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील सर्व साप्ताहिक व दैनिक केंद्रातील महिला पुरूष सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comment here